ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
उजाड झाल्या वाटा..
कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0
6
2
9
9
4
उजाड झाल्या वाटा..
पावसाने दैना केली
ऋतूचक्र निसर्गाचं बदले
हरवली हिरवी स्वप्ने
दु:ख जीवनात आले
उजाड झाल्या वाटा
शुकशुकाट रानीवनी
पशुपक्षी तडफड चालू
कुठेही नाही पाणी
मान टाकली वृक्षवेलीनं
आज झाली रान भकास
गजबजलेल्या वाटा सुनसान
दुःखाचा उरलाय भास
उजाड झाल्या वाटा
जमिनीला पडल्या भेगा
शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
धूळ उन्हात करपली जागा
आयुष्य विस्कळीत झालं
राहिल्या फक्त आठवणी
हिरवळ गेली करपून
नाही राहीलं पाणी
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
6
2
9
9
4



