बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि १ फेब्रुवारी): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात आ. सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शालेय समिती विद्यमान सभासद मोरेश्वर म्हसकर यांच्या अध्यक्षते खाली इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्तविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर रायगड पोलीसांतर्फे शाळेला देण्यात आलेले माझी शाळा सुरक्षित शाळा या सन्मानाचे सन्मानचिन्ह मुख्याध्यापक / प्राचार्य आनिल दारकुंडे सर व जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांनी शालेय समिती सभासद मोरेश्वर म्हसकर व संस्थेचे सभासद परशुराम म्हात्रे यांच्या कडे सुपूर्द केले.
यानंतर रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रायगड पोलीसांतर्फे देण्यात आलेली प्रशस्तीपत्रे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यानंतर इ.१० वी इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेला व शिक्षकांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली.यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सभासद परशुराम म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून तर शालेय समिती सभासद मोरेश्वर म्हसकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी तर आभार प्रदर्शन आशिष राणे सर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.





