मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण धोकायंत्र; पवित्र पोर्टलद्वारे भरती करावी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव परशराम गोंडाणे यांची मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण धोकायंत्र; पवित्र पोर्टलद्वारे भरती करावी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव परशराम गोंडाणे यांची मागणी
उच्चशिक्षित युवकांना शासकीय सेवेत आणण्याचा निर्धार
नागपूर: राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ या योजनेंतर्गत उच्चशिक्षित युवकांसाठी अर्थात डी एड, बी एड झालेल्या युवकांसाठी काढलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रम हा धोकायंत्र असून बेरोजगारांची शुद्ध फसवणूक असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव परशराम गोंडाणे यांनी प्रसार माध्यमास सांगितले.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच पवित्र पोर्टलद्वारे डी एड, बी एड धारक शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून मेगा भरती केली असून, या सर्व शिक्षण सेवकांना १६,००० रू मानधन तीन वर्षापर्यंत देऊ केले आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाद्वारे दि ५ सप्टेंबर २०२४ च्या जी आर नुसार ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ या योजनेंतर्गत गाव खेड्यातील डी एड, बी एड धारक शिक्षकांना शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची १५,००० रू मानधनावर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. हा उचाचशिक्षित असलेल्या तरूण वर्गाचा अपमान असून त्यापेक्षा राज्य शासनाने पवित्र पोर्टल द्वारे याच प्रशिक्षणार्थी डी एड बी एड धारकांची शिक्षण सेवक म्हणून नेमणूक केल्यास रितसर शिक्षक म्हणून सेवाभरती करता येईल. मुख्याध्यापक, राजकारणी, गावनेते किंवा तत्सम जनसेवकांना त्रासही होणार नाही.
तसेच बेरोजगार असलेल्या उच्चशिक्षित तरूण वर्गांना रितसर सेवेत संधी देता येता येईल आणि त्यांचा अपमानही होणार नाही. राज्यातील सर्व डी एड, बी एड धारकांना शासकीय सेवेत रितसर संधी देण्यासाठी कास्ट्राईब संघटनेचा निर्धार असल्याचे गोंडाणे यांनी सांगितले.