Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसोलापूर

कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमणार

जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

0 4 8 2 8 2

कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमणार

७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक!

जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

सोलापूर :जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांचा पट १० व २० पेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही कार्यवाही होईल. सेवानिवृत्त शिक्षकास, ज्यांचे वय ७० वर्षांपर्यंत आहे त्यांची त्या शाळांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना दरमहा २० हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

२०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या १८ हजार ६०० शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत होती. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेनुसार २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची संख्या २५ हजारांपर्यंत पोचली. आता १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर प्रत्येकी एक नियमित तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी दोन नियमित शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही नियमित शिक्षक कमी पडल्यास त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये चार हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

त्या ठिकाणी देखील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. डीएड, बीएड झालेल्या तरुणांऐवजी आता कंत्राटी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांचीच निवड करावी, असे शासनाचे आदेश आहेत.

शासनाच्या आदेशानुसार होईल कार्यवाही

शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेतले जाणार आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकीची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल.

कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

* एकूण अंदाजे शाळा

६३,०००

* शिक्षकांची रिक्त पदे

४,३००

* १० पेक्षा कमी पटाच्या शाळा

८,०००

* २० पेक्षा कमी पटाच्या शाळा

१७,०००

कंत्राटी शिक्षकांना दरवर्षी ८४ कोटी

आदिवासी तथा पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांवर अद्याप नियमित शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातील शाळांवर सध्या ३५०० कंत्राटी शिक्षक नेमलेले आहेत. त्यांच्यासाठी दरमहा सात कोटी म्हणजेच वर्षाला ८४ कोटी रुपयांचे मानधन दिले जात असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे