ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
महाराष्ट्र माझा
0
4
8
2
9
7
महाराष्ट्र माझा
काळ्या मातीत काळी आई
राबतांना दिनरात
घाम गाळतो सर्जाराजा
धनी कष्टतो शेतात
हिरवीगार पिके डोलता
नेत्रकडा पाणावतात
ऐकू ये किलबिल पाखरांची
तृप्त कर्ण सुखावतात
गिरीशिखरे ही कातळपाणी
पाषाणातून घुमते वाणी
एकच नाद दऱ्याखोऱ्यातून
शिवराय जाहले महादानी
कृष्णा कोयना भीमा वरदा
भरून दुथडी वाहतांना
सुजलाम सुफलाम राष्ट्र माझा
गडकिल्ले पाहती गातांना
इथेच निपजले शूर शिवबा
कडाडली लेखणी भीमाची
वसा शिकण्याचा घेता साऊने
मान उंचावली ज्योतीबाची
सविता धमगाये, नागपूर
========
0
4
8
2
9
7



