कवितानागपूरभंडाराविदर्भसाहित्यगंध
कटू आठवणी; वनिता गभणे
0
1
8
3
2
0
कटू आठवणी
नको त्या कटू आठवणी
नको त्यांची उगा साठवणी..
ऊठ गड्या तू ऊठ धैर्याने
भविष्यात शोध गोड गाणी…
आज जरी दु:खाचे मेघ
उद्या बरसेल हर्षित पाणी
नको होऊ हतबल असा
तूच तुझ्या कर्माचा धनी..
मावळतोच दिस उगवणारा
निसर्गाची हिच सुत्रबांधणी
रोखते का चैत्र पालवीला,
शिशिराची ती पानगळणी?
काय देईल सांग तुला?
भुतकाळाची ती उजळणी
वर्तमान असता सुखी मग,
का भावनांची ही हेटाळणी?
अशीच आस तुझ्या अंतरी
फुलवित ठेव तू नितनव्यानी
नको उगाळूस पुन्हा -पुन्हा
त्याच त्या कटू आठवणी..
वनिता गभने
आसगाव भंडारा
0
1
8
3
2
0