राजनिती मैत्रीसाठी ठरे…..! सुधाकर भुरके
राजनिती मैत्रीसाठी ठरे…..!
जो तो मागे धावत आहेत,मिळविण्या खोक्यावर खोका…
राजनिती मैत्रीसाठी ठरे, केवळ आणि केवळ धोका…धृ
ऐसे येतील आणि जातील, सत्तापिपासू पुढारी कैक…
केवळ मतलबापुरते,देती वचने, आमिषे फेक…
निवडून येता कामी नसे,म्हणे निर्बल प्रजेला ठोका…
राजनिती मैत्रीसाठी ठरे, केवळ आणि केवळ धोका…
असो जरी विपरीत स्थिती,या असोत जीवनी संकटे…
सामर्थ्याने सांभाळून घेण्या,मार्गी लावावी येणारी तंटे…
जीवनाच्या सामन्यात नित्य,मारू चला आनंदाचा चौका…
राजनिती मैत्रीसाठी ठरे, केवळ आणि केवळ धोका…
नेते असो या असो पुढारी,नाते,मैत्रीत तुकडे करी…
जाऊ नकात त्यांच्या झाश्यात,होऊ नका एक दुजा वैरी…
जपून वागा सोडा वैरत्व,नाशवू नका मैत्रीचा मौका …
राजनिती मैत्रीसाठी ठरे, केवळ आणि केवळ धोका…
ज्यांच्यासाठी वैर पत्करले,धावून आले का ते संकटी?…
निव्वळ पाजून गेले तुम्हां, मैत्रीमध्ये वैरत्वाची घुटी…
“सुधाकरा” विकासाच्या मार्गी,जाम करून गेलेत चक्का..
राजनिती मैत्रीसाठी ठरे, केवळ आणि केवळ धोका…
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========



