0
4
8
2
9
0
सौदामिनी
बाळराज पाठीशी बांधूनी
तेजधार तलवार घेतली
घोड्यावरी मांड ठोकूनी
युध्दासाठी रणी झेपावली
मर्दानी ही झाशीवाली
जशी तळपती सौदामिनी
शत्रूची कोंडी फोडत चालली
पराक्रमी ती मनस्विनी
किती जणांचे प्राण घेतले
किती वीरांना पाणी पाजले
प्राणांची बाजी लावूनी
इंग्रज सैन्या तिने नमविले
बीज मराठी बाणा कणखर
सत्तांधांशी दिधली टक्कर
जुलमी शत्रू जेरीस आणला
राणी झाशीची ही धुरंधर
रक्तबंबाळ देह जाहला
शत्रूपुढती नाही नमली
तेजतळपती ही दामिनी
मरून ही कीर्तीरुपे उरली
“मेरी झाँसी नहीं दूँगी मैं
बोल तिचे बुरुजावर घुमती
नम्रतेने माथे हे झुकती
अलौकिक त्यागा पुढती
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
===========
0
4
8
2
9
0



