
0
5
5
8
5
6
कोठून येते बळ
रापलेल्या चेहऱ्यावर
कष्टाची झळाळी
जुगाड शेतीचा
पाऊस अवकाळी
उन्हातान्हात राबती
मेहंदी मातीची हातावर
तरीही आनंदाची लाली
चढे तुझ्या गालावर
कोठून येते बळ
नष्ट झाल्यावर सर्वकाही
काहीच उरत नाही
निसर्ग परीक्षा पाही
रोज नवे आव्हान
नित्य नवा परिपाठ
कष्टाची पेरणी करताना
बरकतीची पहाते वाट
उमेदीचं पाणी शेतात
बियाणं रुजवलं मेहनतीनं
तिच्या कष्टाचं चीज
होऊदे सर्वार्थान
गौरी संतोष नेर्लेकर
नेवासा,जि.अहिल्यानगर.
0
5
5
8
5
6



