0
4
8
2
9
7
मशागत
शेतामधूनी ऊन पडते,
घामात भिजते माती,
नांगर फिरती ओढणीवर,
कष्टांची गाथा सांगती.
भाकरीसाठी राबणारा,
नित्य मातीशी खेळतो,
दररोज नव्याने स्वप्न पेरतो,
मनातून पाऊस वेचतो.
खुरपं, फावडं, आणि नांगर,
त्याचीच भाषा, त्याचे शस्त्र,
कधी न थकता तो चालतो,
फक्त श्रमांचे जाणतो शास्त्र
उगमातून अन्न तयार,
पिढ्यांपिढ्यांचा आधार,
मशागतीतून साकारतो
धनधान्य युक्त शिवार.
वाऱ्याशी बोलतो तो,
ढगांशी करतो संवाद,
शेती त्याची साधना,
जमिनीशी त्याचं व्रतसाध्य.
प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव -रायगड
=========
0
4
8
2
9
7



