0
4
8
2
9
0
गोधडी
गोधडी म्हणजे नसतं नुसत
चिंध्याचं बोचक्याचं गाठोळं
असतं मायेची ऊब त्यात
आईन विनलं असतं सुईनी
त्यात असतं वडीलांच्या
बंडीची मागची पुढची बाजू
त्यात असतं ताईच्या फ्राकच्या
चमकदार कपडयाची बाजू
असते त्यात दादाची पॅन्ट
तुकडे तुकडे कापलेली ठिंगळ
आईच्याच प्रेमळ फाटक्या
लुगडयाला करतात ते परिपूर्ण
आई करती चष्मा वरखाली
जुडवित रंगबिरंगी झालर
सुई टोचती बोटाला बिनतक्रार
देती गोंधडी ला सुंदर आकार
गोंधळी शिवायला एक दिवस
नाही तर लागतात महिणे
अनेक चिंध्या बसविल्यास
असतात दाटीदाटीने गुंफण
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,जि नागपूर
=======
0
4
8
2
9
0



