0
4
8
2
9
0
तेव्हा पिकलं शिवारं
नांगराचा फाळ
घामाचा साक्षीदार
बा,सरिसरीत झिजला
तेंव्हा पिकल शिवारं…..१
होई ढेकळाची माती,
मऊसर रन दिसे
चाले बैलं पांभर
चाड्यावर हसू दिसे…..२
झिजलेला देह,
त्याला कष्टाची झालर
जगण्याची झुंज
चाले रानभर……३
दमलेला देह,
ओढ लागली घराची
रान निजले सांजेत
स्वप्न घेऊन उदयाची….४
झिजलेला देह
त्याला कष्टाची झालर
बा,सरीसरीत मुरला
तेंव्हा पिकलं शिवारं….५
श्री पैठणकर.के.आर(नगरसुल)
ता येवला जि नाशिक
0
4
8
2
9
0



