
0
4
8
2
9
4
आषाढ सरी
नभ भरून आले
आभाळ दाटून आले
माझ्या बळीराजाचे मन
आज सुखाने न्हाले..
गडगडाट करी चपला
डोल ताशे वाजे अंबरी..
आनंदली वृक्षवल्ली
रिमझिम रिमझिम पाऊस संगे
जेंव्हा बरसल्या आषाढ सरी…
ग्रीष्माची मरगळ झटकून
शीतल वारे वाहू लागले..
इवल्या इवल्याशा थेंबाने ही
रानोमाळ हरित झाले..
आसमंतात उत्साह पसरले..
वाटे जणू भूगंधाचे निसर्गात
कोणी अत्तर शिपंडले…
ऊन पावसाच्या खेळाने
नभी सप्तरंग उधळले…
आषाढ सरीचे स्वागतात
मयूर ही नाचू लागले..
तहानलेली विरहणी
धरणी अन् अबंराचे
वाटे मनोमिलन झाले.
भेगाळलेल्या धरेवर जेंव्हा
अमृताचे थेंब पसरले..
मृदुला कांबळे
गोरेगांव, जि.रायगड
============
0
4
8
2
9
4



