Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमुंबईसाहित्यगंध

बाईचा पदर

लेखिका: तृप्ती पाटील, मुंबई

0 5 4 7 4 5

बाईचा पदर

आपल्या भारतीय संस्कृतीत महिलेला जो मान सन्मान आहे, तो इतर देशात सारखाच असेल असे मला तरी वाटत नाही. परंतु, याच भारतीय महिलांनी आपल्या ‘नारी संस्कृती’ची पार वाट लावल्याचे चित्र सध्या समाज माध्यमात दिवसागणिक पहायला मिळते. ‘बाईचा पदर’ लाईक्स, कमेंट्स मागण्यासाठी नाही तर स्वतःची इज्जत जपण्यासाठी आहे. फेसबुकवर बायका लाईक, कमेंटसाठी पुरुषांजवळ भीक मागतात. बापरे..!! काय मेंटॅलिटी बायकांची झाली आहे. कारण लाईक कमेंट्स मिळाले तर त्या बायकांना भरपूर पैसे मिळतात आणि त्या बायका कमेंटसाठी अंग प्रदर्शन करतात. बायांनो लाईक आणि कमेंट्स हे तुमचे जीवन नाही. ज्या पुरुषांजवळ तुम्ही लाईक कमेंटची भीक मागताय, तिथे तुम्ही स्वतःची अब्रू वेशीवर टांगत आहात.

‘बायकांची इज्जत इतकी स्वस्त झाली आहे का’? आता बाई लाईक कमेंटसाठी पुरुषांजवळ पदर पसरत आहे. एक काळ असा होता की, आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी बाई देवाजवळ पदर पसरत होती. एक काळ असा होता की, बाई त्या पदराने आपल्या मुलाचं तोंड पुसत होती. आणि तो पदर डोक्याच्या खाली येऊ देत नव्हती. पण आता असा काळ आलेला आहे की, बाई पुरुषांजवळ पदर पसरून लाईक आणि कमेंटसाठी भीक मागत आहे आणि आपली अब्रू वेशीवर टांगतांना दिसत आहे. बाईची अब्रू आता इतकी स्वस्त झालेली आहे का?. बाईला आता अब्रूची किंमत राहिलेली नाही. पैसा म्हणजेच जीवन, पैसा म्हणजेच अस्तित्व हेच आता उरलेलं आहे.

पण पैशांपेक्षा बाईचं अस्तित्व, तिचं स्त्रीतत्त्व हे लाख मोलाचं आहे. पैसा आज कमावला ना की उद्या तो निघून जातो, पण इज्जत एकदा गेली ना कधी परत मिळत नाही. त्यासाठी तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही चांगलं कर्म करा, पण “एकदा काच फुटली की ती कितीही जोडली तरी पूर्वीसारखी होत नाही”. हेच अंतिम सत्य आहे. म्हणून पैशांपेक्षा इज्जत महत्त्वाची आहे. इज्जत सुखाने भाजी-भाकरी खाऊन देते, पण पैशांचा लोभ मनुष्याच्या जीवनाची हानी करतो.

लेखिका: तृप्ती पाटील, मुंबई
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे