‘अजिंक्य रहेगा हिंदुस्थान, खत्म होगा पाकिस्तान’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे : 26 मे 2025 वरिष्ठ नागरिक काव्यमंच , महाराष्ट्र ईकाई संस्थेतर्फे नुकतेच ऑनलाईन राष्ट्रीय बहुभाषिक काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर होते.या राष्ट्रीय बहुभाषिक ऑनलाईन काव्यसंमेलनाचे आयोजन, प्रास्ताविक, स्वागत आणि प्रभावी सूत्रसंचालन संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सुवर्णा जाधव यांनी केले.
संस्थेच्या दिल्लीच्या संरक्षक, ज्येष्ठ कवयित्री सुनिता बनसल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.या संमेलनात नवी दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, शिलाॅग,जयपूर , कानपूर आसाम, मुंबई, अहमदाबाद आदि भागातील ज्येष्ठ कवी उपस्थित होते.
डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि सुवर्णा जाधव यांच्यासह कैलाश बिहारी, सुषमा सौम्या, प्रणव भारती, सौरभ जाधव आदिंनी काव्यसंमेलन गाजवले.एकूणच काव्यसंमेलनाचा सूर प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचा होता. हे काव्यसंमेलन आतंकवादावर तुटून पडणारे होते.” आता अधर्मावर धर्मच मात करेल , अजिंक्य रहेगा हिंदुस्थान – खत्म होगा पाकिस्तान ” असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.





