
0
4
8
2
5
1
छंद-एक आनंद देणारा
छंद एक असावा
मित्रास भेटण्याचा
गतस्मृतीना उजाळा देण्याचा
छंद एक असावा
पर्यटनाचा
देशोदेशीची माहिती मिळविण्याचा
छंद एक असावा
आप्तस्वकीयांना भेटण्याचा
तुटलेली नाती जोडण्याचा
छंद एक असावा
पूर्तता करण्याचा
मदतीचा हात देण्याचा
छंद एक असावा
रोजनीशीचा लिहिण्याचा
गुणदोषाचे अवलोकन करण्याचा
छंद एक असावा
आनंद देणारा
मरगळलेल्या मना फुलविणारा
बी. आर. पतंगे (beeke )
जिल्हा अहिल्यानगर
0
4
8
2
5
1



