Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

सरकारी गोंधळ

मायादेवी गायकवाड ठोकळ मानवत, जि.परभणी

0 4 8 2 8 6

सरकारी गोंधळ

शासनकर्ती जमात
झाली अप्पलपोटी,
वाढलेले ताट पाहून
पाणी सुटे,जिभी ओठी.

हिसकावून ताटातले
स्वतःच्या घाली पोटी,
हपापलेली जमात
पळवी फसवून रोटी.

निवडणूक येता
नेतेगिरी बोकाळे,
सरकारी गोंधळ कांही
ना कधी, कोणा, कळे.

पैशाची बरसात करून
मताची होई पळवा पळवी,
बाळकडू खोटेपणाचे
घराणेशाही दाखवी.

असतो,ज्यांच्या हाती ससा
सदैव,होई तोच पारधी,
हक्क गाजवी शिकारीवर
म्हणे मीच केली,शिकार आधी.

मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत, जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे