Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

झाकणझुल्या

मायादेवी गायकवाड ठोकळ

0 4 8 2 9 0

झाकणझुल्या

विचार आचारात नको तफावत
एकनिष्ठ रहावे तत्वावर,
धरसोडपणा करू नको
टपलेत सारे, तुझ्या वाईटावर.

असावा स्थिर, खंबीर,
तुझ्या मनाचा समतोल,
विसंबून दोन्हीही डगरीवर
जाईल बरं,मनाचा तोल.

बेइमाना,बंद कर आता तरी
असं झाकणझुल्यागत करणं,
खाल्या मिठास,जाग आता तरी
नसता,होईल जग हसं,अश्यानं.

तुझ्या, व्यक्तिमत्वाला
ज्यांनी दिली होती, ओळख,
नको,धरसोडपणा करू
जागृत ठेव तुझी पारख.

वरवरच्या आकर्षणाला
नको जाऊस भुलून,
मृगजळ आहे फसवे
तुम्ही,जरा घ्यावे पारखून.

मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे