भारतमातेच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवास मध्ये उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
भारतमातेच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आवास मध्ये उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि ६) शुक्रवार दि. १५ अॉगस्ट २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी भारतमातेच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ११ वी व इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे ग्रंथपाल नथुराम म्हात्रे सर यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम आमंत्रित केले व नथुराम म्हात्रे सर यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली. त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ९ वी व इ. १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली.
त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ८ वी, इ. ९ वी व इ. १० वी मधील विद्यार्थीनींनी वारी प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथपाल नथुराम म्हात्रे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारीणी सभासद सुहास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.
शेवटी ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सदस्या ज्योती पवार यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची शाळेपासून ग्रुप ग्रामपंचायत, आवास पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी मध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. आपल्या भारतमातेचा जयघोष करण्यात आला. प्रभात फेरी ग्रुप ग्रामपंचायत, आवास येथे पोहोल्या नंतर सर्व प्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ११ वी व इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.
त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली. त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ९ वी व इ. १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली.
त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ८ वी, इ. ९ वी व इ. १० वी मधील विद्यार्थीनींनी वारी प्रात्यक्षिक सादर केले. अतिशय सुंदर असे वारी प्रात्यक्षिक सादरीकरण केल्या बद्दल विद्यार्थीनींना ग्रुप ग्रामपंचायत, आवास सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर कवळे यांनी ५०० रुपये व बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर यांनी ५०० रुपये पारितोषिक दिले.
या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायात, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी जयेश पाटील, आवास गावच्या पोलिस पाटील श्रेया म्हात्रे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे, कार्यकारीणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारीणी सभासद सुधाकर राणे, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आवास ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांना ग्रुप ग्रामपंचायत, आवास यांच्या मार्फत खाऊचे वाटप करण्यात आले.





