मालेवाडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
रजत डेकाटे, प्रतिनिधी
मालेवाडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
रजत डेकाटे, प्रतिनिधी
नागपूर: (मालेवाडा प्रतिनिधी): भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राखी इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आचल तोंडे यांच्या हस्ते मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.
गावात विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. त्यात ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडीचाही समावेश होता. यात वारकरी मंडळीने भजनपुजनाने ग्रामपंचायत कार्यालयातून सुरुवात केली.
विद्यार्थ्यांनी झंडागीत व राज्यगीत घेण्यात आले. तंबाखू मुक्तीवर शपथ घेण्यात आली.यावेळी देशभक्ती गीतावर कवायत करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा चापले यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी केले तर आभार सुरज येल्ले यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा स्वाती सहारे, भुमेश्वरी सातपुते, सहाय्यक शिक्षिका, उपसरपंच फुलचंद मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य दिनेश सहारे, मनोहर वानखेडे, स्मिता बावणे, मंदा क्षीरसागर, ज्ञानवंती ढुमणे, रेखा येसनसुरे, दुर्गा सहारे, आरोग्य सेवक मयुर शेंडे,ह.भ.प.राजेश्वर पसारे, नामदेव इंगोले, धनराज सातपुते, महाराज,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश लोनगाडगे रामु लाखे, पोलिस पाटील इंदू गेडाम,आरोग्य सेविका मीनल बारंगे, आशा वर्कर सुनिता गजघाटे, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, शिक्षण सेवक अजय झोडापे, शिपाई विकास गोवारदिपे, रुपेश सहारे, इतर पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





