“तिरंग्याच्या रंगात रंगला न्यु मून स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा
तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
“तिरंग्याच्या रंगात रंगला न्यु मून स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा
तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी
अर्जुनी/ मोर : न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज अर्जुनी/मोर.येथे स्वातंत्र्यदिन सोहळा देशभक्तीभावाच्या गुंजारवात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य राकेश उंदिरवाडे , ध्वजारोहक शाळा समिती सचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्रमुख अतिथी संतोष बुकावन ,राधेश्याम भेंडारकर , संजय पवार युवराज मानापुरे, पर्यवेक्षिका तारका रुखमोडे, प्रा.अनिल डोंगरवार,सखी सावित्री व विशाखा समिती व पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण, पालकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री.ओमप्रकाशसिंह पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकताच सर्वांनी मानवंदना देऊन एकत्रितपणे राष्ट्रगीत,राज्यगीत, व विजयी विश्व तिरंगा प्यारा हे ध्वजगीत गायले व वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले.
स्वातंत्र्यदिनाच्या या पावन पर्वावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या वातावरणातही विद्यार्थ्यांचे लेझिमच्या तालावर पाय थिरकले,व चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणाने पालकांचे मने जिंकून घेतले. नृत्य,भाषण,समूहगीत, कवायत यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका त्रिवेणी मुनेश्वर,प्रा.सुरज मोटघरे,प्रा.प्रविण नागपुरे,प्रा.निकीता मानापुरे, निकीता बन्सोड,प्रतिक्षा राऊत,शिला बोरीकर, छबू बागडे,अमिषा चौधरी, पायल बोरकर,श्रद्धा बर्गे, राखडे, शिवणकर,पाटणकर या सर्वांनी व नान टिचिंग स्टाॅफ, सहकार्य केले.संचालन प्रतिक्षा डोंगरवार यांनी तर उपस्थितांचे आभार सागर जांभुळकर यांनी मानले.शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पावसाच्या थेंबांसह विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे, हातात लहरणारे तिरंगे आणि मनात भरलेली देशभक्ती या सगळ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.



