Breaking
अहमदनगरई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

खडाजंगी

प्रवीण हरकारे

0 4 8 2 9 0

खडाजंगी

झाली सुरु सकाळी सकाळी
खडाजंगी आई, बायकोची
सप्तसूर लागले दोघींचे
आदळआपट झाली भांड्यांची.

भांडण दोघींचे सुरु होता
दिवस माझा खराब जातो
काय बोलावं सुचत नाही
मूड माझा बिघडून जातो.

जुन्या पुराण्या गोष्टींवरुन
वादविवाद दोघी घालती
अवघड माझी परिस्थिती
गुंग होतसे माझी मती.

ही म्हणते दोन शब्द बोला
खडसावा तुमच्या आईला
आई म्हणे सांग दोन शब्द
तुझ्या कजाग बायकोला.

दोघींनाही खडसावण्याची
हिंमत मजला होत नाही
बायकोशिवाय झोपण्याची
सवय मला मुळीच नाही.

खूप मी विचार केला
मार्ग काढू यावर कसा
ठेवू कसा खुश दोघींना
मला सुचला उपाय खासा.

गुपचूप बोललो आईला
खोटं खोटं बोलतो तुला
मनात काही ठेवू नकोस
खुशी वाटेल माझ्या पत्नीला.

तेच सांगितले गुपचूप
कानात माझ्या बायकोच्या
तडातडा बोललो तिला
मोद जाहला माझ्या आईला.

सुखी झाल्या दोघीजणी
मी पण संतोष पावलो
दोघींच्या खडाजंगीतून
सहीसलामत मी सुटलो.

प्रवीण हरकारे
जि.अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे