Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

मनसंवाद

सविता पाटील ठाकरे सिलवासा, दादरा नगर हवेली

0 6 4 5 2 5

मनसंवाद

गर्दीमध्ये मन एकटे
शब्द शोधते अंतरीचे
ओठांवरती मौन दाटे
स्वर उमटती काळजाचे
चेहऱ्यावरती हास्य फुले
डोळ्यांमध्ये पाऊस दाटे
मन आपुले मनास कळे
दुःख कुणाला सांगावे ते?
रात्र उतरता नभांगणी
चंद्र विचारतो हळुवार
काय हरवले अंतर्मनी?
मन देते मौनात उत्तर
भूतकाळाच्या पाऊलखुणा
आज पुन्हा का जाग्या होती?
आठवणींच्या ओल्या वाटा
मनास कुठे दूर नेती?
मन म्हणते,थांब जरा तू
हरवू नको या गर्दीत
जप स्वतःला, शोध स्वतःला,
उमल पुन्हा नव्या प्रीतित!
जग जरी अनोळखी झाले
मन राहो आपुले सोबत
स्वतःसाठी स्वतःच झाले
मनसंवाद साधत साधत
गर्दी सरते, रात्र निवते
पहाट नवी दारी येते
मनाशी जे मन बोलते
तेच जगणे शिकवून जाते!

सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 2 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे