0
4
8
2
8
4
परिवर्तन
परिवर्तन ठरेल नांदी
उद्याच्या सार्थ भविष्याची
क्रांतीचे द्योतक मानवा
तमा नको यशापयशाची
मिळेल प्रेरणा बदलाने
कार्यास लाभेल नव उर्जा
जुने सोडून देता देता
कार्यपद्धतीचा दिसेल दर्जा
संथ गतीला येईल पुनश्च
एकदा नव्याने तेज धार
परिवर्तन नियम निसर्गाचा
करूया आपण अंगीकार
परिवर्तन होता कार्यभाराचे
मिळते कार्यास नवी दिशा
नवचैतन्य मनी जागवते अन्
जागृत होते नाविन्यपूर्ण आशा
इष्ट असे परिवर्तन जगी
नको करावयास इनकार
परिणाम दिसती खरोखर
घडेल नव क्रांतीचा साक्षात्कार…
घडेल नव क्रांतीचा साक्षात्कार….
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
0
4
8
2
8
4



