Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध

सखी तुझा वाढदिवस

शर्मिला देशमुख-घुमरे

0 4 8 2 9 7

सखी तुझा वाढदिवस

सखी तुझा वाढदिवस दरवर्षीच येत असतो
तुझे कौतुक करायला तो दिवस पुरत नसतो
आज तुला थोडेसे सांगू का मनातले
बरेच काही बनून गेलीस तू माझ्या जीवनातले

गुढ आहेस तू मौन माझ्या मनाचे
नाते जसे तेलासवे मंद मंद वातीचे
जीवनाची एक पाकळी पुष्प आहेस बहरलेले
तू नसताना जणू जीवन माझे विस्कटलेले

माझ्या गालावरची हास्यखळी तू उमलणारी
प्रत्येक माझ्या पावलावर सोबत तू चालणारी
अंतर तुझ्या माझ्यातले फक्त इतकेच आहे
मी वृक्ष जरी असले छाया मात्र तू आहे

असतील काटे जरी माझ्या जीवनात बोचणारी
तू समस्येची उकल बनून सदैव मला फुलवणारी
रस्ता आहे जरी माझा खडतर प्रवासाचा
त्यावर शिंपलेला सडा तू पाकळ्यांचा

नसते जीवनात येणे जाणे उगाच लिहिलेले
असतील कुठेतरी ऋणानुबंध जोडलेले
अल्लड खट्याळ कधी समजावणारा तुझा सहवास
तुझ्या सवे करायला आवडतो जीवनप्रवास

शर्मिला देशमुख-घुमरे
केज रोड,बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे