आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरनांदेडमराठवाडासाहित्यगंध
प्रेमाचा जांगडगुत्ता
बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0
4
8
2
8
4
प्रेमाचा जांगडगुत्ता
नवखा मी गं प्रेमात सखे
समजून मजला घे ना जरा
शिकेन मी शिकवशील तसे
अजब भासतो तुझा तोरा
तारुण्याच्या मी उंबरठ्यावर
देशील का तू साथ मजला
विद्यार्थी कोरा मी या शाळेचा
झुलवशील का तू प्रीत झुला
खरीच असावी ही प्रीत प्रिये
नसावा प्रेमाचा जांगडगुत्ता
साधाभोळा मी शिवसांब
नको फसवणूकीचा कित्ता
हळव्या माझ्या या ह्रदयाला
प्रेमभंगाने सखे नको छळू
झालोय आता मीपण सजग
लागले नखरे मज तुझे कळू
काटा जरी मी गुलाबातला
संरक्षण तुझेच मी करतो गं
करतील स्पर्श तुजला कोणी
डंख मारुनी हात धरतो गं
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
===========
0
4
8
2
8
4



