Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील राजगुरू यांच्या जन्मस्थळी सदिच्छा भेट

पुणे प्रतिनिधी, वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 9 7

पुण्यातील राजगुरू यांच्या जन्मस्थळी सदिच्छा भेट

पुणे प्रतिनिधी, वसुधा वैभव नाईक

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: दि. 26/04/2025 रोजी माझा कार्यक्रम खेड या गावामध्ये होता. राजगुरुनगर जवळच खेड आहे. मी घरातून खूप लवकर निघाले. मला दोन वाजता या कार्यक्रम ठिकाणी पोहोचायचं होतं. खेडला जाऊन राजगुरुनगरला भेट देणे हे माझं परम कर्तव्य होतं. मी माझ्या मुलांना, नातवंडांना घेऊन राजगुरू यांच्या जन्मस्थळी भेट दिली.

तिथल्या परिसराची ओळख करून घेतली. गावात सरपंचांचे राज्य असावे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या कार्याचा आढावा भित्तीपत्रकावर लावला होता. 1931 सालातील सकाळ पेपर त्यावर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची माहिती होती.

राजगुरू यांच्या ह्या वाड्यामध्ये राजगुरूंचा फोटो आहे त्याला अखंड दिवा तेवत असतो आणि त्यांच्या अर्थी पण फोटोमध्ये होते तुम्हाला दिसत आहेत. पर्यटकाच्या दृष्टिकोनातून तिथे काम चालू आहे. लांबून पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. इथे आल्यावर राजगुरूंच्या फोटो समोर नतमस्तक व्हायला होते.

राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या क्रांतीमुळे जीवनाचे विविध पैलू येथे थोडक्यात वाचायला मिळतात. त्यांचा वाडा अजूनही तसाच आहे. वाड्याची देखभाल करण्यासाठी एक स्त्री तिथे होती. एक गाईड होता त्यांनी आम्हाला तिथली माहिती दिली. या स्थळाला भेट देऊन समाधान वाटले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे