बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये सहलीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये सहलीचे आयोजन
शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार सकाळी ठीक ५.३० वाजता विद्यार्थी व शिक्षक विद्यालयातून एस. टी. बस मध्ये बसून मौज मजा करत, गाणी म्हणत सर्व प्रथम नडाळे या ठिकाणी पोहोचले. तेथील पंचतायन मंदिरांची अतिशय सुंदर अशी वास्तू पाहून प्रत्येकाचे मन मोहून गेले. मंदिरात जाऊन प्रत्येकाने गणपती, महादेव, हनुमान, साईबाबा व तुळजा भवानीचे दर्शन घेतले. आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली.
त्यानंतर पुन्हा एस. टी. बस मध्ये बसून सर्वजण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुप्रसिध्द माथेरान या पर्यटन स्थळी पोहचले. तेथील निसर्ग सौंदर्य पाहून सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. यात सुखद अनुभव म्हणजे तेथील शांतता व वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज. अशा प्रफुल्लित वातावरणात गप्पागोष्टी करत, गाणी म्हणत भटकंती करून सर्वांनीच सहलीचा मनमुराद आनंद लुटला. प्रत्येकाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. सर्वांनी स्नेहभोजन केले.
त्यानंतर माथेरानहून ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेत सर्वजण नेरळ या ठिकाणी आले व तेथून एस. टी. बस मध्ये बसून मौज मजा करत सर्वजण रात्री ११.३० वाजता विद्यालयात पोहचले. या सहलीमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, धनराज फड सर, दत्तात्रेय अहिरे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी गिरी काका आणि ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सहली साठी मोलाचे सहकार्य केले.





