Breaking
चारोळीपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगसंपादकीयसाहित्यगंध

‘अश्रू विझवतील का हा वेदनेचा वणवा..?; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण

0 1 8 3 0 9

‘अश्रू विझवतील का हा वेदनेचा वणवा..?; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण

माझं सुख माझं सुख, हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख, तळघरात कोंडलं.

किती किती बांध घालायचा मनाला. शांत डोहाच्या अंतरंगात ज्वालामुखी कोंडून ठेवलाय, पण कधी कधी एखादा खडा पडतोच, नको त्या आठवणींचा नि शांत जलावर उचंबळतेच लाट. एकटं असल्यावर तर या आठवणी गर्दी करतातच; पण गर्दीतही पाठ सोडत नाहीत. घोंगावत येणारं हे वादळ भवताली फेर धरतं नि वेड्यासारखं छळतं. मग कितीसा वेळ लागतो त्या अश्रूलाही पापणीचा बांध ओलांडायला. ते गालावर कधी येऊन विसावतात ते कळतही नाही. मनातली वेदना सांगायची तरी कुणाला.? अन् कसं सांगू कुणाला.? झाडावर घाव घालताना कु-हाडीचा दांडा झाडाचा सगाच असतो, पण घाव मात्र असे देतो की,अगदी तसंच झालंय. परक्यांनी वेदना दिल्या तर त्या एवढ्या जिव्हारी लागत नाहीत पण घाव देणारे आपलेच असतील तर..!!

तरीही हास्याचा मुखवटा घातलाय. पण थकून गेलेय त्याचं ओझं वागवताना. “असह्य डंख सहन करत रंगभूमीवर वावर चालू आहे”.‌ निर्माल्य होईपर्यंत गंधाचं दान लुटायचं आहे, पण कळ्याच करपून गेल्यात. मनात फुललेली बाग वणव्यात होरपळते आहे. कदाचित अश्रू विझवतील का हा वणवा..? सुखस्वप्न केवळ दिवास्वप्न ठरतंय. रणरणत्या उन्हात तहान लागावी अन् केवळ मृगजळामागेच धावाधाव करावी. हा भ्रमनिरासही मिटवतील का हे अश्रू? कदाचित नाही. अश्वत्थामाच्या भाळासारखी आपल्यांनी दिलेली जखम सतत ठसठसत राहते. तो मनातला वणवा विझायला पाऊसच हवा आपलेपणाचा, मायेचा, प्रेमाचा. ती जखम भरून यायलाही फुंकर हवी ती मायेचीच.

देती आपुलेच जखमा
वेदना सांगू कुणाला
कसे थिजतील हे अश्रू
फुंकर हवीय मनाला

आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी ‘वेदना सांगू कुणाला’ या विषयासह गालावर ओघळणारे अश्रू दाखवणारे तिचे चित्र पाहून अनेक वेदना तरळल्या व रूदन शब्दबद्ध झाले. चित्र पाहताच आधी आठवल्या त्या वर लिहिलेल्या बहिणाबाईंच्या ओळी. खरंय माणूस सुख जगाला ओरडून सांगतो अन् दु:ख मनात कोंडून ठेवतो. दु:खातील अश्रू सांडायला हवा असतो आपुलकीचा, आपलेपणाचा खांदा. तोच खांदा आधार न देता आघात करणारा ठरला तर..? या विचारासह विविधतेने नटलेल्या आपल्या सर्वांच्या रचना लक्षवेधीच. असेच लिहित रहा व्यक्त व्हा. मनातील दुःख व्यक्त करण्याचे काव्य हेदेखील एक माध्यम आहे. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 0 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे