२६ जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा
उदगीर(लातूर) :- तमाम उदगीरकरांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण जवळ आला असल्याची चाहूल मिळत आहे. राज्यात काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, इतर काही नवीन जिल्ह्यासोबत लातूर व शेजारच्या नांदेड (Nanded)जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. बाऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार
असा असेल संभाव्य उदगीर जिल्हा…
मुक्रमाबाद की बाऱ्हाळी.?
बाऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, देवणी व जळकोट तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असून शेजारील नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलुर तालुक्याचे विभाजन करून मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार आहे. तर, जळकोट व अहमदपूर शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही गावांचा समावेशही नवीन उदगीर जिल्ह्यात होणार आहे. तसा मसुदा तयार असल्याची माहिती हाती लागत आहे. तसे पाहिले तर, उदगीर जिल्हा मागच्या सरकारमध्येच होणार होता. मात्र, फडणवीसांनी (Fadanvis)त्यासाठी घेतलेली मेहनत व महत्वकांक्षी योजनेचे श्रेय इतरांच्या नावावर पडू नये यासाठी काळजी घेत सदरील निर्णय मंत्रिमंडळाने तात्पुरता हातावेगळा केला होता. तो पुन्हा अजेंड्यावर असून त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त काढला असल्याचे बोलले जात आहे.
आमदार संजय बनसोडे हे आपल्या जाहीरनाम्यातील प्रथम वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्व कार्यालय, त्यांच्या इमारती सज्ज आहेत. शिवाय, एमएच ५५ अशी नवी ओळखही त्यांनी मागच्या टर्ममध्येच मिळवून दिली आहे. आता २६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील संभाव्य जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यात उदगीरचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याची चर्चा आहे.
असा असेल संभाव्य उदगीर जिल्हा…
नांदेड जिल्ह्यातील मुखेड व कंधार व लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील काही गावाचा समावेश जळकोट तालुक्यात केला जाणार असून नांदेडमधील लोहा तालुक्यातील काही गावे अहमदपूर तालुक्याला जोडली जाणार आहेत. तसेच, नांदेड जिल्ह्यातील देगलूर व मुखेड तालुक्यातील व उदगीरमधील काही गावे घेवून नवीन मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी तालुका होणार आहे. अशा रचनेनुसार, संभाव्य उदगीर जिल्हा प्रस्तावित असून त्यात उदगीर, अहमदपूर, देवणी, जळकोट व मुक्रमाबाद किंवा बाऱ्हाळी अशा पाच तालुक्याचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मुक्रमाबाद की बाऱ्हाळी.?
उदगीरच्या जवळ परंतु नांदेड जिल्ह्यात असणारी मुक्रमाबाद आणि बाऱ्हाळी ही मोठी बाजारपेठ असलेली दोन गावे आहेत. सदरील दोन्ही गावाची नावे संभाव्य उदगीर जिल्ह्यात तालुका म्हणून जुडण्यासाठी आग्रही आहेत. दोन्हीपैकी एक तालुका करून पाच तालुक्याचा उदगीर जिल्हा करायचा मसुदा तयार करण्यात आला असून कोण बाजी मारणार याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे.