रक्तगट तपासणी शिबिर 105 मुलींनी केली तपासणी
रजत डेकाटे, प्रतिनिधी उमरेड
रक्तगट तपासणी शिबिर 105 मुलींनी केली तपासणी
रजत डेकाटे, प्रतिनिधी उमरेड
उमरेड: (प्रतिनिधी): उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2024 मध्ये भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.रक्तगट तपासणी शिबिर स्थानिक पब्लिक हायस्कूल येथे पार पडला.यामध्ये एकूण 105 मुलींची रक्तगट तपासणी करण्यात आली.लाईफ लाईन रक्तगट तपासणी चमू नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला मंचावर प्रमुख उपस्थिती लोटस डायग्नोस्टिक सेंटर चे संचालक मिथुन मुळे,पब्लिक हायस्कूल चे मुख्यध्यापक माधव कुसराम संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी,अध्यक्ष दीपक पटले, सचिव गौरव रहाटे संयोजक सचिन कुहिकर,संस्थापक पुर्वाध्यक्ष प्रदीप चींदमवार , पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर प्रामुख्याने उपस्थिती होती.
विद्यार्थीनिना आरोग्याबाबत माधव कुसराम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश मुलचंदाणी यांनी केले तर आभार गौरव रहाटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर आदमने, प्रवीण लाडेकर, पवण मडावी,हितेश गडबोरीकर,दिनेश ढेबुदास,शुभम सिर्सिकर, आनंद पूनवटकर,श्रीकांत बोरकर विक्रांत वरघने जॅकी गोविंदांनी आदींचे सहकार्य लाभले.