“ऋणनिर्देश शब्दसुमने, कृतज्ञतेचे दोन शब्द”; बी.एस.गायकवाड
मराठीचे शिलेदार समूहाने भरभरुन लिखाणाचे बळ दिले

“ऋणनिर्देश शब्दसुमने, कृतज्ञतेचे दोन शब्द”; बी.एस.गायकवाड
मराठीचे शिलेदार समूहाने भरभरुन लिखाणाचे बळ दिले
सोमवार ते गुरुवार या चार ही दिवस सुरु असलेल्या वैविध्यपूर्ण काव्य स्पर्धेत,माझ्या चार ही रचनेला सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित केल्याबद्दल, मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा व सर्व परीक्षक टीम चे मनःपुर्वक खूप खूप धन्यवाद..
या सप्ताहात सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेत, ‘कधी भेटशील..?’, मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेत, ‘वाघाची मावशी’, बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत, ‘अशी असावी कविता’, आणि गुरुवारीय चित्र चारोळी स्पर्धेत, ‘प्रेम बंधनात मी’, अशा प्रकारे चार ही रचनांना सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले. सतत चार दिवस सुरु असलेल्या या सन्मानपत्रामुळे मुळे,मनोमन हर्ष झाला. मन भारावून गेले. का कोणास ठाऊक, आभार सुमने लिहायला बसलो की, वाटायचे उद्याला मानू आभार… चित्र चारोळीच्या अगोदर मात्र वाटले चला, उद्याला लिहू आभार. म्हणून बऱ्याच रचना समुहात लिहिल्या आणि त्यात ही वर्णी लागली.
विशेषता बुधवार ,गुरुवारच्या रचना अग्रस्थानी विराजमान झाल्या. हायकू रचना मात्र आपल्या आवाक्यात नाही. असे ठरवून शेवटी या चार दिवस सुरु असलेल्या स्पर्धेत, सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित केल्याबद्दल आभार मानणे परम कर्तव्य समजुन व्यक्त होत आहे.
समूहाशी नाळ जोडल्या पासून, समूहाने भरभरुन लिखाणाचे बळ दिले आहे. परिक्षक, सह प्रशासक, ताई दादांचे, सर्वांचेचं परिक्षण वाचत असतांना, पुन्हा पुन्हा वाचावे असेच वाटले. त्यातील शब्दवैभव, नाविन्यता, शब्द माधुर्य, खूप काही मनभावन असेच असते.कोणतेही परिक्षण वाचताक्षणी एक वेगळा आनंद चेहऱ्यावर व अंतर्मनाला सुखावून जात असतो. मी जो काही काव्य क्षेत्रात घडलो, नव्याने ओळख निर्माण झाली.आज मी, ‘कविवर्य’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकलो ते केवळ आणि केवळ शिलेदार समूहाचीचं देण आहे.
आमच्या शाळेच्या जानेवारी महिन्यात पार पडलेल्या, वार्षिक स्नेह संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी,सूत्र संचालन करतांना, प्रत्येक गाण्याच्या सुरुवातीला, अनुरूप अशी माझ्या रचनेतील चारोळी घेऊन, संपूर्ण कार्यक्रम अगदी उठावदार, टाळ्या घेणारा, खूप सुंदर,यशस्वी कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. एकंदरीत समुहामध्ये माझ्या सारख्या असंख्य कवींना व्यासपीठ मिळाले. आणि नवी ओळख निर्माण झाली. जीवनाचे सार्थक झाले आहे.
खूपदा ईच्छा असूनही वेळेअभावी ऋण निर्देशातून व्यक्त होता येत नाही. आणि कधी कधी वेळातला वेळ काढून ही व्यक्त झाल्या शिवाय जिवाला चैन पडत नाही. समूहात मिळणारी कौतुकाची थाप ही तितक्याच उत्साहाने काव्य लिखाणास प्रेरणादायी ठरते. माझ्या रचनेस सन्मानित केल्याबद्दल पुनश्च एकदा सर्व परिक्षक ताई दादा व समुहाचे आधारवड आदरणीय राहूल दादा आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन शिलेदार समूहाच्या सदैव ऋणाइत राहणे पसंत करतो
बी एस गायकवाड
पालम,परभणी
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह





