Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“हिंदू धर्माची वैश्विक गाज, महाकुंभमेळा प्रयागराज”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 8 4

“हिंदू धर्माची वैश्विक गाज, महाकुंभमेळा प्रयागराज”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेचे परीक्षण

जगाच्या पाठीवर एकमेव असा भारत देश आहे, की ज्याला भारतमाता म्हटले जाते. जिथे धरती, नदी यांना माता म्हटले जाते, जिथे गाईला मातेचा दर्जा दिला जातो आणि जिला माता म्हटले तिच्या पायावर आदराने माथा ठेवला जातो. जसे लेकरासाठी सर्वात सुरक्षित जागा आईची कुशी असते त्यातली खुशी वर्णावी तरी कशी. जिच्यासमोर स्वर्गसुखही कमी.
अशा या भारतभूमीत कुठे ना कुठे धार्मिक, सांस्कृतिक मेळे सतत भरत असतात. ज्यातून अतिप्राचीन वैदिक धर्मसंस्कृतीचे विराट दर्शन होत राहते. याच परंपरेतील एक अद्भुत सोहळा म्हणजे कुंभमेळा. अलिकडे सोशल मिडियामुळे संपूर्ण भारतवर्षात महाकुंभमेळ्याची वैविध्यपूर्ण प्रसिद्धी झाल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही भक्तगणांचा प्रचंड ओघ प्रयागराजकडे धाव घेऊ लागला. या सर्वाचा विचार करता सरकारने अतिशय उत्तम व्यवस्थापन करूनही कोटीच्या घरात जनसंख्या एकत्र आल्याने अतिरिक्त ताण आलाच. परिणामी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. अशावेळी स्वयंशिस्त आणि व्यवस्थेकडून येणार्‍या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते. दुर्दैवाने काही वाईट घटना घडल्या. मात्र याचे खापर अनेक नास्तिकांनी पद्धतशीरपणे सरकारी यंत्रणा आणि हिंदूधर्मपरंपरेवर फोडून तोंडसुख घेतलेच.

कुंभमेळ्यात उपस्थित राहिलेले साधू, संत, नागा, अघोरी, तपस्वी आणि त्यांचे हत्ती घोडे रथावरून शाही स्नानास जाण्याची पद्धत या गोष्टी खूप विलक्षण आहेत. कायम सिमेंटच्या चार भिंतीआड राहणारे आणि कधीही वैदिक परंपरेचा चिकित्सक अभ्यास न केलेल्यांना कायम जंगल निवासी आणि घोर तपस्वी असलेल्या साधू संतांच्या विद्वत्तेची कदापी कल्पना येणार नाही. कायम बिस्लरी वाॅटरची बाटली बखोटीला मारून फिरणार्‍यांनी तर गंगास्नानाच्या पावित्र्यावर बोलूच नये. जप, तप, व्रत आणि वेदपठण यातले अवाक्षरही न जाणणार्‍या वाचाळवीरांनी पुरातन हिंदू संस्कृती आणि कुंभमेळ्यावर सारासार विवेक बुद्धीने विचार करूनच मते व्यक्त करावी. शेकडो वर्षे वयोमान असूनही सदृढ असणारे साधू संन्यासी या कुंभात आपण पाहिले आहेत. प्रयागराज येथील संगमस्थळ आणि शाहीस्नान यांचे वैज्ञानिक विश्लेषण करायचे झाल्यास खूप काही लिहावे लागेल.

अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या महाकुंभमेळ्यात शनि, मंगळ, शुक्र, गुरू आणि चंद्रकोर सूर्योदयाच्या आधी १४४ वर्षांत प्रथमच २९ जानेवारीला पहाटे नक्षत्र पुष्यासह एकाच रेषेत फिरताना दिसतील हे आधीच सांगून ठेवलेले भारतीय खगोलशास्त्र आणि पंचांगाचे किती हे एक अद्भुत तेज आहे. १४४ वर्षांपूर्वीच सध्याचा मुहूर्त अधोरेखित केला होता. काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेसाठी समूहप्रमुख आ. राहुल दादांनी जे चित्र दिले ते याच अनुषंगाने आहे. समूहात नेहमीच वैविध्यपूर्ण विषय असतात आणि ते समाजमनाशी जोडलेले असतात. त्यावर भाष्य व्हावे हाच एक उदात्त हेतू असतो. या चित्रावर सुद्धा अनेक हायकूकारांनी आपापल्या परीने भाष्य केले.

हिंदू संस्कृतीने नेहमीच फक्त राष्ट्रीय नव्हे तर वैश्विक एकात्मता, बंधुता आणि शांतीचे संदेश दिले आहेत. ज्ञानेश्वरांचे पसायदान, तुकोबांची गाथा, वारकरी संप्रदाय याचीच उदाहरणे आहेत. कुंभमेळा आणि पवित्र शाहीस्नान ही सुद्धा एक अशी परंपरा आणि सोहळा आहे की जगाने त्यातल्या विज्ञानाचा अभ्यास करावा. तेव्हाच श्रद्धेतील ताकद लक्षात येईल.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©परीक्षक,सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे