‘डी सी ए’च्या राज्यस्तरीय प्रवेशपात्र परीक्षेत हर्षिता पाटील टॉप ‘सेव्हन’मध्ये
नागपुरची 'हर्षिता पाटील' एकमेव मराठी माध्यमातील मेरीट विद्यार्थीनी
‘डी सी ए’च्या राज्यस्तरीय प्रवेशपात्र परीक्षेत हर्षिता पाटील टॉप ‘सेव्हन’मध्ये
इयत्ता पाचवीसाठी राज्यातील फक्त सात मुलींची निवड
नागपुरची ‘हर्षिता पाटील’ एकमेव मराठी माध्यमातील मेरीट विद्यार्थीनी
प्रवेशपूर्व परीक्षेसाठी राज्यातील पालकांची अलोट गर्दी
वर्ग ५ ते ११वी साठी ‘ऐंट्रस’चे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी छ.संभाजीनगर
छ.संभाजीनगर: ‘डिफेंस करीयर अकाडमी’ विद्या प्रबोधीनी’ संकुल छत्रपती संभाजीनगर येथे ‘डीसीए’ तर्फे (दि २फेब्रुवारी) रविवार रोजी शहापूर (बंजारा) येथील डीसीए च्या संकुलात शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी वर्ग ५ ते ११ वीच्या प्रवेशासाठी राज्यातील मुला मुलींची प्रवेशपूर्व परीक्षा पार पडली. यात वर्ग ५ वी साठी ‘कु हर्षिता राहुल पाटील, नागपूर, स्व देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळा, ता. हिंगणा, जि. नागपूरच्या चिमुकलीचे ३५० मुलीपैकी ‘टॉप ७’ मध्ये निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी राज्यातील शेकडो पालकांनी अलोट गर्दी केली होती. सकाळी ८.०० ते ३.३० पर्यंत पालकांनी आपल्या पाल्यांना डीसीएच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सोडले. यात डीसीए व्यवस्थापनाने १०० गुणांची लेखी परीक्षा (इंगजीत), वैयक्तिक चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी व मुलाखत या सर्व प्रक्रीयेतून सर्वच मुला मुलींना जावे लागले. या दरम्यान सर्वांना ‘ब्रेफास्ट व लंच’ डीसीएतर्फे देण्यात आले. सर्व प्रक्रीया झाल्यानंतर मेरीट लीस्ट सर्वासमक्ष जाहीर करण्यात आली. यात मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूर चे अध्यक्ष संस्थापाक राहुल पाटील यांची सुकन्या कु हर्षिता राहुल पाटील हिने पहिल्या सातमध्ये येण्याचा बहुमान पटकाविला. मराठी माध्यमात असलेल्या हर्षिताचा मोठा भाऊ अखिलेश पाटील हाही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनच पूर्वपरीक्षेतून मेरीट येऊन सैनिक स्कूल, चिखलदारा येथे शिक्षण घेत आहे.
डीफेन्स करीयर अकाडमी, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या प्रवेशपूर्व परीक्षेनंतरच्या पालक बैठकीस मराठीचे शिलेदार संस्थेचे प्रसिद्ध कवी व प्रसिद्ध उद्योजक विजय शिर्के हे व मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य परीक्षक/ सहप्रशासक/ प्रसिद्ध कवी व लेखक विष्णू संकपाळ संभाजीनगर हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी हर्षिताचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.