सातनवरी गावात अवैध दारू विक्रेत्याला आला उत
व्यसनाधीन युवकांच्या आत्महत्याने परिसरात वातावरण तंग
सातनवरी गावात अवैध दारू विक्रेत्याला आला उत
व्यसनाधीन युवकांच्या आत्महत्याने परिसरात वातावरण तंग
धामणा ( लिंगा) प्रतिनिधी – संजय खांडेकर
नागपूर: शहरातील नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील (टोली) सातनवरी जिल्हा नागपूर येथे अवैध दारू विक्रेत्यांना उत आला असून सातनवरी, सातनवरी (टोली) नजिकच्या खैरी गोसाई, चनकापूर इत्यादी गावातील युवक वर्ग दारूपायी व्यसनाधीन झाल्याचे चित्र आहे. या परिसरात अवैध धंदे वाढले असून, दारुच्या नशेत आपली वाहने चालवताना अनेक युवकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आई वडिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून काही जागरूक नागरिक प्रयत्न करतात. पण अवैध दारू विक्रेते आपले धंदे बंद करत नाही ,अशातच सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी सातनवरी गावचे माजी सरपंच विद्यमान ऋषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे सदस्य विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली (टोली) सातनवरी व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात सातनवरी ग्राम पंचायतच्या वतीने सातनवरी गावातील व परिसरातील दारूबंदी करून दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार त्रिपाठी यांना देण्यात आले.
याप्रसंगी गावचे माजी सरपंच विजय चौधरी, अनिल गोतमारे , संजय भोगे, विक्की डोमके,शुभम चचाने,अजय सोनबरसे, अविनाश जैतगुडे, अनिल काळबांडे,आदीत्य भोगे,मनोज कुबडे, भाऊराव कपाळेसह अनेक नागरिक तसेच BS4NEWS Youtube Channel चे प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा (लिंगा) जिल्हा नागपूर हे उपस्थित होते.