
0
4
8
2
5
1
चांदरात
अर्थ तुझ्या मौनाचा
कळू दे मला आज
चांदरात ही आली
लेवून नक्षत्रचा साज
डोळ्यात पाहून माझ्या
काहीतरी गं बोल
आता तरी कळू दे
तुझ्या हृदयातील ओल
वाटतं तू खुप बोलावं
मनामद्ये साठलेलं
निस्सीम तुझं प्रेम
पापणी आड लपलेलं
गहिवरलेलं मन तुझं
नी कोंडलेला श्वास
कळवळतोय जीव माझा
तुला पाहून उदास
आज पुन्हा नव्याने बघ
सजलीय चांदरात
अर्थ मौनाचा कळू दे सखे
दे विश्वासाने हाती हात
इंदू मुडे ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
4
8
2
5
1



