कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
एकांत; सविता धमगाये
0
4
8
2
9
4
एकांत
आवडतो मज शांत
नदीकिनारी एकांत
मध्येच शीळ देत
उडणारा निलकांत
त्या लहरी संथगतीने
येता किनाऱ्याकडे
अडखळत खडकाला
झेपावती ध्येयाकडे
भक्ष्य शोधीत फिरता
होतो स्वतःच भक्ष्य
चंदेरी चकाकी ओढून
विचलित करता लक्ष्य
संथपणे डुलणारी
लव्हाळी गार हिरवी
घेऊन पाचूचे तुरे
डोईवरी मस्त मिरवी
बोलती मजसवे
सावल्या लांबणाऱ्या
उधळतो रवी मुक्तपणे
केशर पाण्यात भिजणाऱ्या
सविता धमगाये
जि.नागपूर
0
4
8
2
9
4



