Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सूर्यफूल – स्नोई

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 0

सूर्यफूल – स्नोई

दिनांक 10 जून 2011 ला माझ्याकडे एक पाहुणा आला. हो हो पांढराशुभ्र ! कसा …? त्याला कारण ही तसेच होते. माझी धाकटी मुलगी श्रृतिकाची मैत्रिण अपेक्षा तिवारी तिच्या पप्पांनी तिला वाढदिवसला एक ‘पाॅम्ररीयन डाॅग’ भेट दिला. पण तिच्या आजीची इच्छा पप्पीला ठेवायची नसल्यामुळे 15 दिवसाच्या मेल डाॅगीला आम्ही त्याच किंमतीत घरी आणले व नाव ठेवले ‘स्नोई’. रॅबीज, गस्टोचे इंजेक्शन त्याला दरवर्षी त्यांच्या व्हक्सीन कार्ड नुसार घेत असतो. आधीच आमच्याकडे एक वर्षाची जुली होती; पण स्नोई लहान असताना कापसासारखा मऊ, पांढरेशुभ्र केस सुरवातीला जुली तिच्याकडे जात नव्हती. हळुहळु जुली पंजानी त्याच्या पाठीवर हात ठेवू लागली, जवळ घेऊ लागली दोघात छान मैत्री झाली. दोघातून एकालाच फिरावयास नेले तर कुणीही फिरावयास जात नसत. दोघानांही एकाच वेळेस फिरावयास न्यावे लागत असे. स्नोईला वरच्या दुसर्‍या माळायावरील गच्चीवर फिरावयास व बसायला आवडत असे.

एकदा स्नोई छोटा असताना गॅलरीच्या लोखंडी डिझाईन मधुन खाली पडला तेव्हा जुली धावत खाली गेली व स्नोईस कुरवाळू लागली.स्नोईचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या वाचुन त्याला करमेना मी जिकडे जाणार तिकडे तो माझ्यासोबतच असायचा.मी किचनरुम मध्ये काम करीत असल्यास तो स्वतःच हाॅल ,वऱ्हाडा इथे बसुन असला तरी मम्मीचा अर्थात माझा चेहरा त्याला दिसायला हवाच म्हणूनच घरचे लोक त्यांला गंमतीने सूर्यफूल म्हणतं. घरी कुठलेही कार्यक्रम असोत फोटोपोज म्हटलं की छान बसायचा मी सकाळला 9 वाजता शाळेकरीता निघाली की तो तेव्हापासून सायंकाळपर्यंत गेटवरच बसून माझी चातकासारखी वाट बघायचा .कुठल्या गावावरून तीन दिवसाच्या वर जास्त दिवस झालेत की तो खाणेपिणे सोडून देत असे म्हणूनच मला भद्रावतीला पतीच्या नोकरीच्या ठिकाणी दिवाळीत किंवा उन्हाळ्यात जुली व स्नोईला कारनी सोबत घेऊन जावे लागायचे.

माझी कामवाली पिंकी मला आवाज देताना सुरवातीपासून स्नोईच्या मम्मी म्हणूनच आवाज देतात ऐकावयास अवघड वाटत असले, तरी मला त्याची सवय झाली. माझ्या शेजारी असलेल्या भटनागर भाभी मी घरी नसताना स्वतः येऊन त्याला दुध पोळी देत असत.त्याला त्या चपळू म्हणतं. कच्चे मळलेलं कणीकाचे पीठ खायला स्नोईला आवडायचे संपुर्ण पोळया होत पर्यंत छोटे छोटे गोळे मध्ये मध्ये त्याला दयावे लागायचे कोळपाठ- बेलन ठेवताच तो निघुन जायचा म्हणजे कणीक संपलं हे त्याला कळायचं त्याला स्पा करून आणले की खुपच सुंदर दिसयाचा.

सकाळ व रात्रीला दोन्ही वेळेस मी स्नोई व जुलीला फिरावयास नेत असे.तीन दिवसानंतर दोघांचीही आंघोळ त्यांचा बेड, शाॅम्पू,साबण ,टाॅवेल सर्व साहित्य स्वतंत्र होते.स्नोई समोर चला म्हटले की धावतच तो पुढे छान गेट च्या समोर उभा असायचा त्याला फिरावयास खुप आवडायचे म्हणूनच आम्हास कुठे बाहेर पडायचे असल्यास ‘ चला ‘ म्हणने सोडून Chla म्हणावे लागत असे.

मी साडी घातली किंवा ओळणी घेतली नक्कीच त्याला कळयाचे मम्मी बाहेर पडणार चोर पावलानी नकळत मला बाहेर पडावे लागयचे, नाही तर भुंकणे थाबंत नसायचे. स्नोईची गंमत करावी म्हणून माझ्या दोन्ही मुली माझ्याशी उंच आवाजात रागाणी बोलायच्या त्यावेळेस तो मुलीवर उडी घेऊन भुंकत असे.माझ्या मम्मीला काही म्हणायचं नाही असच त्याला काहीस वाटतं असावं. मी झोपताना तो माझ्या पायाशीच झोपायचा. तीन चार दिवसानंतर कुठून परत आले की,स्वतः माझ्या मांडीवर येऊन बराच वेळ लाडात असायचा कुठे कुठे शिरू अस स्नोईला होऊन जायचं.

तीन दिवसापूर्वीच त्याने खाणे, फिरावयास येणे बंद केले दिनांक 5 डिसेंबर 2024 ला रात्री 9.15 मिनिटांनी मी स्नोईला, ‘स्नोई स्नोई’ म्हणतच राहीले. माझ्यासमोर प्रत्यक्ष हुंदका देत त्याने प्राण सोडला. मी त्यांचे अंत्यसंस्कार मनुष्याप्रमाणे केले चांदमारी मंदीर जवळील एन.एम.सी.च्या डाॅगी शेल्टरकडे एक मोठा खड्डा करून त्यात मीठ टाकून त्यावर नवीन कापड टाकले. त्यावर स्नोईला ठेवून पुन्हा मीठ व मातीने दफन केले फुल, हार , मेणबत्ती,अगरबत्ती वाहिली दुसर्‍या दिवशी तिथे जाऊन दही भात चढविला. स्नोई व मी एकमेकांचे जीव की प्राण होतो. यालाच म्हणतात निस्वार्थ प्रेम,जेवढे प्रेम तुम्ही जनावरांना देता ना त्यांच्या दुप्पट तो मानवावर प्रेम करतो. माझ्या चिरकाल पटलावर राहणाऱ्या स्नोईला अभिवादन !

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे