‘एच बी टी’ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
नागपूर शहर प्रतिनिधी

‘एच बी टी’ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि १४) : शादाब एज्युकेशन सोसायटी, नागपूर द्वारा संचालित हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड नागपूर च्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष मा.अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (सोफी) व संस्थेचे सचिव मा.मोहम्मद शादाब अब्दुल सलिम (सोफी) यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील सत्तार यांनी सांगितले की, बाबासाहेबांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण मानव जातीला दिशा देणारे आहेत. शिक्षण, समता आणि न्याय या जीसुत्रीवर आधारित समाजाची निर्मिती करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या जयंती उत्सवानिमित्त प्रा.डॉ.विनोद शेंडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भारत का संविधान तसेच अनेक मौल्यवान ग्रंथ, ग्रंथालयाकरीता भेट म्हणून दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अ. शकील अ.सत्तार, डॉ. वीरेंद्र आदमने, डॉ.सुभाष धोटे, डॉ.सुरेश काळे, डॉ. मीनाक्षी इंगळे, डॉ.विनोद शेंडे, डॉ.सुनिल अखंडे, प्रा. अर्पित थूल, प्रा.रेणू तिवारी, डॉ.सतीश बोबडे, प्रा.उपेंद्र गुप्ता, नंदलाल शर्मा, शादाब खान, कुमेश बिहार, प्रमोद झोडे, मार्तंड गोंडाने, नियाज़ अली, प्रकाश मेश्राम, गणेश राजपूत, व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



