माझी पाककला: मगज व्हील करंजी
मीनाक्षी काटकर ता.दारव्हा, जि.यवतमाळ

माझी पाककला: मगज व्हील करंजी
साहित्य पारीसाठी- 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी बेसन,दोन चमचे कडकडीत गरम तूप, अर्धी वाटी रवा,चिमुटभर मीठ इत्यादी.
सारणासाठी : 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, एक वाटी मगज पावडर, एक वाटी पिठीसाखर, वेलची पूड, तूप इत्यादी.
कृती : मैदा, बेसन, रवा,मीठ, गरम तूप घालून घट्ट पीठ मळा. 20 मिनिट झाकून ठेवावे. कढईत 4 चमचे तूपावर बेसन मंद आचेवर 8-10 मिनिट खमंग भाजा (रंग बदलेल आणि वास येईल). त्यात रवा टाकून 2 मिनिट अजून भाजा. मगज बी पावडर टाकून गॅस बंद करा. पूर्ण थंड झाल्यावरच पिठी साखर आणि वेलची पूड टाका – गरम असताना साखर टाकली तर पाणी सुटेल. दोन एकसारख्या मोठ्या पात्या लाटा. एकावर एक ठेवून मधला भाग स्टार साच्याने काढून घ्या. एका पारीवर सारण ठेवून त्यावर दुसरी पारी ठेवून कडा नीट दाबून घ्या.मंद आचेवर तळून घ्या. तयार झाली आपली मगज व्हील करंजी.
वाढप: ही रेसीपी तीन ते चार व्यक्तीस पुरेल.
मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
=========



