Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“इतरांचा मनसुबा ओळखून सावधपणे वागणे गरजेचे”; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

0 5 1 6 5 1

“इतरांचा मनसुबा ओळखून सावधपणे वागणे गरजेचे”; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

माणसाच्या प्रत्येक कृतीमागे एखादा हेतू, विचार किंवा योजना दडलेली असते. एखादे काम कसे करायचे, कोणत्या मार्गाने करायचे आणि त्याचा परिणाम काय होईल याचा आधी विचार करून आखलेली योजना म्हणजे मनसुबा होय. मनसुबा हा शब्द अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनातील उद्देश किंवा हेतू व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. मनसुबा हा चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. त्यामुळे मनसुब्याचे महत्त्व त्यामागील उद्देशावर अवलंबून असते.

चांगल्या मनसुब्यामुळे समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण घडते. इतिहासात अनेक महान व्यक्तींनी उदात्त मनसुबे ठेवून मोठे कार्य केले. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा मनसुबा केला. त्यासाठी त्यांनी प्रचंड धैर्य, दूरदृष्टी आणि कष्ट यांचा आधार घेतला. त्यांच्या या मनसुब्यामुळे जनतेला स्वाभिमा न आणि स्वातंत्र्याची जाणीव मिळाली. त्याचप्रमाणे महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा महान मनसुबा केला. अनेक देशभक्त,क्रांतिकारक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा मनसुबा केला. चांगल्या मनसुब्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतात.

परंतु काही वेळा लोक स्वार्थ, लोभ किंवा मत्सरामुळे वाईट मनसुबे आखतात.इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये याची अनेक उदाहरणे आढळतात. महाभारतात दुर्योधनाने पांडवांना द्यूतात हरवण्याचा कपटी मनसुबा आखला. या कुटिल डावामुळे पांडवांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे अफझलखानाचा दुष्ट मनसुबा शिवरायांनी आधीच ओळखला.त्याची परिणीती म्हणजे अफझलखानाचा वध झाला.

सध्याच्या काळातही मनसुबे बदललेले नाहीत, फक्त त्यांचे रूप बदलले आहे. आजचे जग मोठ्या प्रमाणावर आभासी (व्हर्च्युअल) जगात जगू लागले आहे. इंटरनेटमुळे लोक एकमेकांशी सहज जोडले जातात; परंतु या आभासी जगात अनेकदा लोक मुखवटे घालून वावरतात. चांगला मनसुबा केवळ व्यक्तीला यशस्वी करत नाही, तर समाजालाही योग्य दिशा देतो. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘मनसुबा’ हा वैचारिक विषय दिला आणि शिलेदारांना चौफेर विचार करायला लावला. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. राहुल सरांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे