Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 1 7 5 8

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : आईचे पत्र📘*
*🔸मंगळवार : १७ / मार्च /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आईचे पत्र*

आईचे एक पत्र आलं
कागदावर माया दाटी
गोड गोड ते शब्द बोलं
वाचता मन फुलून येती… //१//

बाळा, नीट तू जेव रे
लांब असलो तरीही आपण
आई प्रेमाने घास भरे
वात्सल्य ठेवू सदा जपून… //२//

कधी सांगते गोष्ट छान
शब्दांमध्ये उपमायेची
कधी विचारते अभ्यास जाण
जणू सावली प्रेमाची… //३//

पत्र वाचता हसू खुलतं
ममत्वचा गोड सुगंध दरवळे
मनात आनंद झुळझुळतं,
हृदय माझं झोपाळ्यात झुले… //४//

आईचं पत्र छोटं दिसे
जपून ठेवीन्रदयासी
प्रेम मात्र त्यातच हसे
आई माझी सदा सोबती… //५//

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

पोस्टमन काका दिसताच
धावतच त्याच्याकडे जायचे
आईचे पत्र आले का काका
कळकळीने मी विचारायचे

आईचे पत्र एक दिवस आले
मजकूर वाचण्यात मी रमले
जणू आईच उभी डोळ्यासमोर
भास आईचे मला होऊ लागले

वाचताना प्रत्येक शब्दात
आईचे वात्सल्य झळक असे
बाळ माझं कस असेल किती
काळजी त्या शब्दात असे

बालपणी तिच्या कुशीत
ना भय ना चिंता होती कसली
तिच्या सहवासात आनंद मिळे
उणीव भासत नव्हती कुठली

माझं गाव आणि घर सुटले
पण कायम होत्या आठवणी
सुगरण आईच्या हाताची चव
आठवता डोळ्यात येई पाणी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र…!*

शाळेची घंटा वाजली
जमती घोळक्यात जमली
बाई कोणता सांगेल खेळी
मना-मनात उत्सुकता रंगली

आईचे-पत्र हरवलं खेळण्याची
बाईकडून मिळाली संमती
गोण्या-मोन्या- सोन्याची
गोलाकार वर्तुळात बहरली दोस्ती

आईच पत्र हरवलं
ते मला सापडलं
खेळताना आली मजा
राज्य करणारा करि आवाजा

धमाल असा बैठी खेळ
पळापळीचा जमतो मेळ
दंगामस्तीत वेळ रंगला
घरी जायचा सर्वांना कंटाळा

शाळा सुट्टीची घंटा वाजली
डाव न आल्याने सारी हिरमुसली
उद्या खेळाची ग्वाही मिळाली
आनंदाने पोरं घरी पळाली

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र…*

चला चला खेळू
आईचे पत्र..
गोल गोल बसा
सारेच मित्र…

बाळूवर आला
खेळाचा डाव
हातात रूमाल
गोल गोल धाव

धावता धावता
बोलला बाळू
सावध झाले
सारे खेळाडू

“आईचे पत्र
हारपले…
सांगा कुणाला
सापडले…”

एका सूरात
बोलले मित्र,
“आम्हाला नाही
सापडले पत्र”

मस्तच रंगली
खेळाची धमाल..
रामूच्या पाठीमागे
ठेवली रूमाल..

वेळीच पडली
रामूची नजर
डाव द्याला
झाला तो हजर

रामूच्या जागेवर
बसला बाळू
पुन्हा जोमाने
खेळ लागले खेळू

चांगलेच रंगले
आईचे पत्र…
मनोरंजन करुन
घरी गेले मित्र…

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आईचे पत्र*

आईचे पत्र यावे खूप वाटते
आठवणींचे गाव मनी दाटते
ती तिथे असेलच खुशाल
सत्कर्माची पांघरलेली शाल

नाही बोलणे नाही भेट
पत्रातून मग संवाद थेट
कशी आहेस विचारते जेंव्हा
नयनी अश्रू दाटतात तेंव्हा

सांगतेस कुणा मनीचे बोल
असे जेंव्हा तू विचारतेस
उरी दुःख वाटते खोल
अन् ह्रदयाच्या तारा छेडतेस

आईच्या मायेला नाही अंत
नसल्याने ती वाटते खंत
आई हा फक्त शब्द नाही
आभाळ ही सामावून जाई

पण आईचे पत्र येणार नाही
गूज कोणा कळणार नाही
तिच्या शिवाय वाटे सुने जग
अंतरी मनी फक्त तगमग

*शारदा जोशी कुलकर्णी*
*ता गेवराई, जि.बीड*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

होते मी शिकायला
घरापासून बाहेर
आठवत होते फक्त
मला माझे माहेर…१

मन नसे लागत
शाळेत रोज आई
घरच्या जेवणाची चव
इथे नसते ताई.. २

घरापासून वेगळे
नका करू कुणाला
प्रेम, माया, जिव्हाळा
मिळत नसे आम्हांला.. ३

उबेची ती गोधडी
आशेचा तो किरण
दिसे इथे फक्त ताई
जेवणात रोज सुरण…४

रोजचं वाटे मला
यावे आईचे पत्र
कधी एकदा संपेल
शैक्षणिक हे सत्र…५

का माझ्या वेदना
कळत नाही बाबाला
नका पाठवू मुलांना
दुसऱ्या शाळेत शिकायला…६

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

आईचे आले गोड पत्र
म्हणे कसा आहेस रे बाळा
अक्षर अक्षर प्रेम भरून
वाचतांना फुटला उमाळा

अभ्यास कर मन लावून
होईल तुझे स्वप्न साकार
चांगल्या सवयी अंगी ठेव
चांगुलपणाचा होतो स्वीकार

खोटे कधी बोलू नकोस
खऱ्याचीचं तू संगत धर
मोठा हो शाळा शिकून
शुभेच्छा तुला आभाळभर

आठवण येते नेहमी तुझी
घर कसे खायला उठते
तुझ्याच भल्यासाठी रे बाळा
दुरावा वाटला तरी सोसते

बाळाने आईचे पत्र वाचून
डोळ्यात हळुवार आले पाणी
प्रेम जिव्हाळा माया सारं
हृदयात दाटल्या आठवणी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

आजी सांगते मला
तुझी आई देवाघरी
पत्रातून रोज रोज
तुझ्याशी बोलणारी…!!

रोज रोज पत्रातून
शिस्त मला लावते
तिची रोजची गोष्ट
मनाला फार भावते…!!

आवर्जून सांगते ती
लवकर ऊठ रे बाळा
एक दिवस सुद्धा तू
बुडवू नकोस शाळा…!!

बाईंची आज्ञा पाळ
रोज कर तू अभ्यास
आजीला मदत कर
नि जा तू खेळण्यास..!!

आई आता लवकर
ये ना आपल्या घरी
रोज रोज पत्र नको
कुशीत घे एकदातरी…!!

उद्या माझा वाढदिवस
नको खेळणी भेट मला
आईचे पत्र वाचताच मी
बोललो आई हवी मला..!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

आईचे पत्र
आले रे मला
परीक्षा संपल्यावर
ये तू. गावाला

आईचे पत्र
वाचले बरे
तिथला मजकूर
होते बरे,,,,

लग्न सराईचा
आहे रे महुल
बाहेर जायची
लागली रे चाहूल

घरचा रोवणी पाणी
संपला आहे आता
मामाच्या घरचा
आहे मला न्यवता

अजी माझी आहे
खूप ठणठणीत
खाण्या पिण्याचा
जमलाय गणित

आई माझी
खूपच लाडाची
काळजी खूप करते
फिकीर तिला जीवाची

आई लिहिते मला
बाळा येते रे आठवण
ये तू लवकर,,,
आठवला लहानपण

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️
*आईचे पत्र*

आजीच्या घरी असताना
मला आले आईचे पत्र..
सुंदरशा पाकिटात त्यावर
रंगवले‌ होते छानशे चित्र…

पत्रात नेहमीचाच मजकूर
मोत्यासारखे आईचे अक्षर…
पत्रातील मोती गोळा करता
डोळ्यांतून अश्रूंचा पाझर..

पत्र होते असे माझ्या बाळा
खूप मन लावून कर अभ्यास…
आजी आजोबांची घे काळजी
देऊ नकोस रे त्यांना त्रास…

सारखे सारखे नको बाळा
खेळायळा जायचे घेऊ नाद….
मित्रांशी नको बाचाबाची
नकोच रे वादविवाद….

शिक्षकांचे ऐकत जावे
शाळेत वागावे सदा छान..
फक्त पुस्तकी किडा नको
पाहिजे व्यवहाराचे ही ज्ञान…

बापरे इतके मोठे आईचे पत्र
अजून ही होते बरेच काहीबाही..
पत्र वाचून वाटले जणु ही
पुस्तकातील श्यामचीच आई…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹📗🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे