
0
4
0
8
9
0
विषमता
विषमतेनी पोखरला
अख्खा देश आपला
मिटेल का हा कलंक
प्रश्न भयानक इथला
जाती,धर्माची गटबाजी
विचारसरणी डामाडौल
गुणवत्तेचा विचार नसे
जातीसाठी मिठे बोल
काही दिवसात,महिन्यात
होतात कोणी कोट्याधीश
कुठून आली मिळकत सर्व
विचारता मनात किलमिष
बाबासाहेबांनी संविधानात
दिली दर्जाची,संधीची समानता
प्रत्यक्षात गरीब इथला
ज्ञानाविणा राही अंधारात
प्रत्येक नागरिकाने आता
जागृत होणे गरजेचे
समानता स्थापित होण्या
हक्क समजणे महत्वाचे
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
0
4
0
8
9
0





