पारोळा जवळील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू
दोघे बचावले मृतामध्ये दोघे सख्खे भाऊ तर एक आते भाऊ
पारोळा जवळील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू
दोघे बचावले मृतामध्ये दोघे सख्खे भाऊ तर एक आते भाऊ
पारोळा ( जळगांव ) :पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणा जवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या पाच अल्पवयीन मुलना धरणात असलेल्या पाण्याचा मोह न आवरल्या मुळे पाच जण पोहण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघा अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोन जण पाण्यातून बाहेर असल्याने ते बचावले असल्याची घटना घडली मृता मध्ये दोघे सख्खे भाऊ व एक त्यांचा मालेगाव येथील आत्तेभाऊ आहे .
शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच तरुण एजाज नी मोहम्मद मोमीन वय 12, मोहम्मद हसन लियाज मोहम्मद मोमीन वय 16, आश्रम पीर मोहम्मद वय 9, इब्राहिम शेख अमीर वय 14 सर्व राहणार बडा मोहल्ला पारोळा ता पारोळा, आवेश रजा मोहम्मद जैनोद्दीन रा मालेगाव जि नाशिक हे पाचही जण दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरातून पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज वय 16, इजाज रजा न्याज मोहम्मद वय 14, रा बडा मोहल्ला पारोळा, आवेश रजा शेख मोहम्मद वय 17 रा मालेगाव जि नाशिक हे तीघे धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले तर दोघे जण धरणाच्या कमी पाण्यात उतरले विशेष म्हणजे पाचही जणांना कोणालाही पोहता येत नव्हते परंतु फक्त किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघं तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले तर दोघे कमी पाण्यात उभे असलेले आश्रम पीर मोहम्मद वय 9, इब्राहिम शेख अमीर वय 14 यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते वाचवू शकले नाही .