‘जातीधर्मावर द्वेश पसरवला तर गाठ माझ्याशी’; सुजय विखे पाटील
जिल्हा प्रतिनिधी, शिर्डी/अहमदनगर
‘जातीधर्मावर द्वेश पसरवला तर गाठ माझ्याशी’; सुजय विखे पाटील
जिल्हा प्रतिनिधी, शिर्डी/अहमदनगर
शिर्डी: माजी खासदार सुजय विखे पाटील वडिलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले असून शिर्डीतील एका सोहळ्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच धारेवर धरलंय. शिर्डी मतदारसंघात कुणीही अशिक्षित नसून जर जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम भरलाय.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात हिंदू मुस्लीम ऐक्य असून अनेक वर्षांपासून सगळे एकोप्याने राहत आहेत.. तीस वर्षात काम करताना आम्ही कधीही जात धर्म बघीतला नाही त्यामुळे जर कुणाला जातीवाद करायचा असेल तर आम्ही सुद्धा अर्ज स्विकारताना जात धर्म बघू असा इशारा देत मतदार संघात जर कुणी जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम भरलाय.
शिर्डीत कोणीही असुरक्षित नाही. मतदारसंघात हिंदू मुस्लिम ऐक्य अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहतो जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही. जर कोणाला जातिवाद करायचा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा अर्ज स्वीकारताना जात धर्म पाहू. तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र जातीचे विष पसरवणारे लोक आता नकोय. साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. आज जनतेच्या गरजा महत्त्वाच्या तो कोण आहे कोणत्या जातीचा हे महत्त्वाचं नाही.