नितीन गडकरींना पुन्हा रस्ते विकास मंत्रालय; तर अमित शहांना गृहखाते
काही खासदारांना जुनेच खाते वाटप
नितीन गडकरींना पुन्हा रस्ते विकास मंत्रालय; तर अमित शहांना गृहखाते
काही खासदारांना जुनेच खाते वाटप
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपली आहे. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे मंत्री उपस्थित होते. अधिकृत घोषणा झाली नसून ३मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. त्यात नितीन गडकरी यांना रस्ते विकास मंत्रालय, अजय टम्टा रस्ते विकास राज्यमंत्री एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आल्याचे समजते.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी सोमवारपासून कामाला लागले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच, त्यांनी पीएम किसान सन्मान निधी च्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर सही केली. यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.
कॅबिनेट बैठकीपूर्वी पीएम मोदींनी पीएमओ अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान कार्यालय हा सेवेचा पाया आणि लोकांचा पीएमओ बनण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे. रविवारी मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिपदांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू झाली होती. आज झालेल्यख पहिल्या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप केले असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.