Breaking
कवितानागपूरसाहित्यगंध

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

सहभागी सर्व कवींचे मनस्वी आभार

0 4 0 9 0 3

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

सहभागी सर्व कवींचे मनस्वी आभार

*रूपगर्विता*

रूपगर्विता तू जाधवांची लेक
घडविला शिवबा लाखात एक
आजही कड्याकपारी त्याचाच धाक..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रूपगर्विता*

चंद्राची चांदणी रंग तुझा गोरा,
रूपगर्विता वयानुसार ढळेल तुझा तोरा,
माणुसकी सदगुणांचा न संपणारा खोरा//

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रुपगर्विता*

रुपगर्विता आम्रपाली ती
मोहात पाडण्या गेली
शरण बुध्दाला ती आली

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रुपगर्विता*

रूपगर्विता तू ग आहेस सौंदर्याची खाण
वार्धक्यात टिकणार नाही ठेव जरा भान
या नश्वर देहाचे मर्म तू जाण

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
==========×+×+==========
*रूपगर्विता*

कमल नयन तू रूपगर्विता
देखणी जणू इद्राची परी
खिळल्या नजरा तुझ्यावरी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रुपगर्विता*

मोहक तुझी अदा
रुपगर्विता ग तू
बाळगतेस अहंकार सदा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रूपगर्विता*

रूपगर्विता तू जणू
स्वर्गलोकाची अप्सरा
नको करुस नखरा

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रूपगर्विता*

देखणे रूप तुझे किती
आरस्पानी सौंदर्य मोहकता
वृथा होऊ नको रूपगर्विता

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रुपगर्विता*

रूपगर्विता तू गं सखे
मनात भरलाय तुझा चेहरा
पापणी आड भाव दुःखाचा गहिरा.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
==========×+×+==========
*रूपगर्विता*

रूपगर्विता म्हणोनी
मिळविली कौतुकास्पद थाप
तुझे रूप ठरले तुझ्या साठी श्राप

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

‘पाऊसधारा’ कवी संमेलनात आपली रचना सादर करण्यासाठी नोंदणी करू शकता. 7385363088

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे