महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची विशाल महिला बचत गट प्रर्दशनीचे बुलढाण्यात आयोजन
प्रर्दशनीमध्ये लागणार 250 बचतगट स्टॉल
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची विशाल महिला बचत गट प्रर्दशनीचे बुलढाण्यात आयोजन
दिशा महिला बचत गट फेडरेशन मार्फत 4,5 आणि 6 ऑक्टोबर ला आयोजन.
प्रर्दशनीमध्ये लागणार 250 बचतगट स्टॉल
महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडून होणार उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा
बुलढाणा:- महाराष्ट्र कोंग्रेस प्रेदश सचिव जयश्री शेळके यांच्या दिशा महिला बचत गट फेडरेशन मार्फत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य महिला बचत गट प्रर्दशनीचे आयोजन 4, 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी बुलढाण्यातील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील प्रांगणात करण्यात आले आहे.
या भव्य बचतगट प्रर्दशनी मध्ये 250 महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे.या स्टॉल मध्ये विविध प्रकारचे घरगुती वस्तू विक्रीला ठेवण्यात येणार असून खवियांसाठी अनेक प्रकारचे पदार्थाची विक्री व प्रर्दशनी होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी विशाल महिला बचत गट प्रर्दशनीचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या महिला नेत्या शरद पवार गट राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, उद्धव गट शिवसेनाच्या उपनेता सुषमा अंधारे तथा महाराष्ट्र प्रदेशच्या राज्य प्रवक्ता हेमलता पाटील याच्या उपस्थित उद्घाटन होणार असून यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दिनांक 4,5 आणि 6 ऑक्टोबर पर्यंत ही महिला बचत गट प्रर्दशनी चालणार आहे. आयोजित या महिला बचत गट प्रर्दशनी मध्ये महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन काँग्रेस प्रेदश सचिव जयश्री शेळके यांनी केले आहे.