आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियविदर्भ
पुसदमध्ये होणारी आज ‘जन सन्मान यात्रा’ पावसामुळे रद्द
जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ
0
1
8
3
1
2
पुसदमध्ये होणारी आज ‘जन सन्मान यात्रा’ पावसामुळे रद्द
जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ
यवतमाळ: जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे. पुसद उपविभागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले असून सभास्थळी देखील पाणी साचले आहे. अनेक गाव व शेतीत देखील पाणी आहे. त्यामुळे अजित पवारांची जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली असून पुढे लवकरच ही यात्रा होईल असे आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
0
1
8
3
1
2