Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

जगरहाटी

विष्णू संकपाळ बजाजनगर छ.संभाजीनगर

0 4 8 2 9 4

जगरहाटी

आले किती गेले किती, राजे महाराजे झाले
अनंत काळापासून अशीच, जगरहाटी चाले..//

शक्ति,भक्ति,युक्तीचा, प्रत्येकाचा अवीट ठसा
आदर्श कार्य कर्तृत्वाचा, इथे घ्यावा मूठ पसा.. //

चाळूनी पहावी पाने, इतिहासही देतोय नारा
छल,कपट,खल वृत्तीस, मुळीच देवू नये थारा..//

जगरहाटीचा दोर फिरवत, काळ चाले मस्तीत
भला बुरा फेरा त्याचा, येई आपल्याही वस्तीत.. //

मग जात्यातलं रडतय, आणि सुपातलं हसतय
ज्याच्या त्याच्या वेळेचं, गणित पक्कं असतय.. //

हा अटळ नियम सृष्टीचा, उत्पत्ती त्याचा र्‍हास
पर अभाव दिव्य दृष्टीचा, म्हणून सर्व अट्टाहास..//

येणे जाणे निश्चित, नकोय किंचितही खंत खेद
इथे निश्चिंत मनाने घ्यावा, अंती मृत्युचाही वेध..//

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ.संभाजीनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे